लडाखमधून चिनी सैन्याची माघार!

लडाखमध्ये चिनी सैन्याने केलेली घुसखोरी अखेर मागे घ्यायला सुरूवात केली. काही दिवसांपूर्वी चिनी सैन्याने लडाखमध्ये अनधिकृतपणे घुसखोरी केली होती.

जयवंत पाटील | Updated: May 5, 2013, 11:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लडाख
लडाखमध्ये चिनी सैन्याने केलेली घुसखोरी अखेर मागे घ्यायला सुरूवात केली. काही दिवसांपूर्वी चिनी सैन्याने लडाखमध्ये अनधिकृतपणे घुसखोरी केली होती. यावर भारतातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
लडाखमध्ये सुमारे 19 किलोमीटर भारताच्या हद्दीत चिनी सैन्य घुसल्याने तीव्र पडसाद उमटू लागले होते. चिनी सैन्याच्या वाढत्या घुसखोरीमुळे भारताची सुमारे 750 चौरस किलोमीटर जमिन चीनच्या ताब्यात गेल्याचं धक्कादायक वृत्त झी मीडियाने दिलं होतं.

भारताने याबाबत चीन सरकारशी चर्चा केली आणि त्यानंतर आज चीनने सैन्य माघारी घेण्यास सुरवात केली आहे.