विद्यार्थीनींवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकाला फाशीची शिक्षा

चीनमध्ये एका प्राथमिक शाळेत शिक्षकानं जवळपास 11 विद्यार्थिनींवर बलात्कार आणि छेडखानी केल्याच्या आरोप होता. या शिक्षकाला प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. गाओ दाओशेंग (59) वरील गुन्हा सिद्ध झालाय. तो वुवेई काउंटी शाळेत शिक्षक आहे.

| Updated: Apr 23, 2014, 11:02 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, बीजिंग
चीनमध्ये एका प्राथमिक शाळेत शिक्षकानं जवळपास 11 विद्यार्थिनींवर बलात्कार आणि छेडखानी केल्याच्या आरोप होता. या शिक्षकाला प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. गाओ दाओशेंग (59) वरील गुन्हा सिद्ध झालाय. तो वुवेई काउंटी शाळेत शिक्षक आहे.
वुही सिटी इंटरमीडिएट पिपल्स कोर्टाच्यावतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, ज्या विद्यार्थिनींवर बलात्कार आणि ज्यांची छेडखानी झाली, त्यांचं वय 14 वर्षाहूनही कमी आहे. 11 पैकी 5 विद्यार्थिनींवर बलात्कार आणि सहा मुलींसोबत छेडछाड झाली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.