केंद्र सरकारकडून चायनीज फटाक्यांना लगाम

चायनीज फटाक्यांनी भारतीय बाजारपेठ काबिज केली आहे. तामिळनाडूतील फटाका उद्योग यामुळे संकटात सापडला होता.  गेल्या महिन्यात तमिळनाडू येथील फटाका उद्योगांची बैठक केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी राजधानी दिल्लीत बोलावली होती.

Updated: Sep 30, 2014, 05:40 PM IST
केंद्र सरकारकडून चायनीज फटाक्यांना लगाम title=

चेन्नई : चायनीज फटाक्यांनी भारतीय बाजारपेठ काबिज केली आहे. तामिळनाडूतील फटाका उद्योग यामुळे संकटात सापडला होता.  गेल्या महिन्यात तमिळनाडू येथील फटाका उद्योगांची बैठक केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी राजधानी दिल्लीत बोलावली होती.

समुद्रमार्गे बेकायदेशीररीत्या आयात होणाऱ्या या फटाक्‍यांमुळे जनजीवन धोक्‍यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले होते.

बेकायदा चिनी फटाक्‍यांच्या आयातीला लगाम घालण्यात येण्याचे सूतोवाच करताना त्या म्हणाल्या, की यासंदर्भात सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले असून त्यांना संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. 

चायनीज फटाके विकले तर कारवाई होणार
"परदेशातून आयात केलेल्या फटाक्‍यांची किरकोळ बाजारात विक्री करणे बेकायदेशीर आहे. तशी कोणालाही परवानगी दिली जाणार नाही. कायद्याचे उल्लंघन करून बाजारात फटाके विकताना कोणी आढळल्यास त्याविरुद्ध कारवाई होईल आणि भारतात फटाके कोणत्या मार्गाने आले, याचाही शोध घेतला जाईल‘‘, असं केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.