भारताला दिली चीनने खुलेआम धमकी

By Prashant Jadhav | Last Updated: Wednesday, January 11, 2017 - 21:31
 भारताला दिली चीनने खुलेआम धमकी

बीजिंग :  भारताने चीनशी मुकाबला करण्यासाठी व्हिएतनामसोबत आपले लष्करी संबंध मजबूत केले तर या भागात वाईट परिस्थिती निर्माण होईल, मग चीन हातावर हात धरून बसणार नाही, असे वृत्त चीनच्या सरकारी मीडियाने दिले आहे. 

भारत जमीनीवरून हवेत मारा करणारे आकाश मिसाईलची प्रणाली व्हिएतनामला देणार असल्याचे वृत्त चीनच्या मीडियाने दिले आहे.  

भारताच्या या पाऊलावर चीनने चिंता व्यक्त केल्याचे ग्लोबल टाइम्समध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखात म्हटले की, जर भारत सरकार रणनैतिक करार किंवा बीजिंग विरोधात सूड घेण्याच्या भावनेने व्हिएतनाम सोबत आपले लष्करी संबंध मजबूत करत असेल तर यामुळे परिसरात अशांतता निर्माण होईल. अशा परिस्थिती चीन हातावर हात धरून बसणार नााही. 

First Published: Wednesday, January 11, 2017 - 21:31
comments powered by Disqus