बाळाला टॉयलेटमधून केलं फ्लश, पाईपलाईन कापून काढलं बाहेर

By Jaywant Patil | Last Updated: Tuesday, May 28, 2013 - 21:09

www.24taas.com, झी मीडिया, बीजिंग
दोन दिवसांच्या एका मुलाला चौथ्या मजल्यावरील टॉयलेटमधून फ्लश केल्याची घटना चीनमध्ये घडली. या बाळाला संरक्षण दलाच्या सैनिकांनी दहा सेंटिमीटर व्यासाच्या पाईपलाईनमधून यशस्वीरीत्या बाहेर काढलं आहे.
इमारतीच्या टॉयलेटमधून २ दिवसीय बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं होतं. डॉक्टर, संरक्षण दलाचे सैनिक यांना बाळाला बाहेर काढण्यास सुमारे एक तास लागला. अखेर, पाईपलाईन कापून या बाळाची सुटका करण्यात आली. या बाळाची गर्भनाळही तशीच होती.
पाईपलाईन कापून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आली होती. या पाईपमधून बाळाला अलगद बाहेर काढण्यात आलं. बाळाची प्रकृती सध्या स्थिर आहे. पोलीस आता या बाळाच्या आई-वडिलांना शोधत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, May 28, 2013 - 21:09
comments powered by Disqus