रेस्टॉरंटची अनोखी ऑफर, 'मिनी स्कर्ट घाला, बिलात सूट मिळवा'

एका चिनी रेस्टॉरंटमध्ये महिला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. रेस्टॉरंटच्या मालकानं ऑफर दिली आहे की, महिला जेवढा मिनी स्कर्ट घालणार, तेवढी तिला बिलात सूट मिळणार. ही ऑफर चीनच्या जिनान शहरातील यांग जिया हॉटपॉट रेस्टॉरंटमध्ये देण्यात येत आहे. या रेस्टॉरंटमधील कर्मचारी महिलेच्या स्कर्टची लांबी मोजतात आणि त्यानुसार त्या महिलेला बिलात डिस्काउंट दिलं जातं. 

Updated: May 19, 2015, 06:03 PM IST
रेस्टॉरंटची अनोखी ऑफर, 'मिनी स्कर्ट घाला, बिलात सूट मिळवा' title=

पेइचिंग: एका चिनी रेस्टॉरंटमध्ये महिला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. रेस्टॉरंटच्या मालकानं ऑफर दिली आहे की, महिला जेवढा मिनी स्कर्ट घालणार, तेवढी तिला बिलात सूट मिळणार.

ही ऑफर चीनच्या जिनान शहरातील 'यांग जिया हॉटपॉट रेस्टॉरंट'मध्ये देण्यात येत आहे. या रेस्टॉरंटमधील कर्मचारी महिलेच्या स्कर्टची लांबी मोजतात आणि त्यानुसार त्या महिलेला बिलात डिस्काउंट दिलं जातं. 

स्कर्ट गुडघ्याच्यावर तीन इंच असल्यात बिलात २० टक्के सूट देण्यात येते. तर गुडघ्याच्या १३ इंच स्कर्टवर असल्यास बिलात ९० टक्के सूट देण्यात येत आहे. 

रेस्टॉरंटचा मालक ईसन सांग यानं सांगितलं की, बाजारातील मंदीमुळं, आम्ही अशा ऑफर देत आहोत. या ऑफरमुळं रेस्टॉरंटला वाढीव ५० टक्के महिला ग्राहक मिळाल्या आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.