महिलांची काढली विवस्त्र धिंड

By Surendra Gangan | Last Updated: Thursday, June 20, 2013 - 20:28

www.24taas.com, झी मीडिया, इस्लामाबाद

पाकिस्तानमध्ये महिलांवरील अत्याचार पुढे आले आहेत. चक्क महिलांची विवस्त्र धिंड काढण्याचा प्रकार आज गुरुवारी पाकिस्तानमध्ये उघड झालाय.
पाकिस्तानातील एका टोळक्या्ने तीन महिलांना विवस्त्र केलं. त्यानंतर त्यांची गावातून धिंड काढली. याबाबत तसा दावा एका वृत्तपत्राने केलाय. शस्त्रधारी टोळक्याने शस्त्राचा धाक दाखवून महिलांना विवस्त्र होण्यास सांगितले. या महिला ख्रिश्चन असल्याचे सांगण्यात येत आहे.
महिलांच्या नातेवाइकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, अब्दुल रशीद यांच्या पीएमएल-एन या पक्षाला पाठिंबा देण्याच्या मागणीवरून शस्त्रधारी टोळके सादिक मसिह (७३) यांच्या घरामध्ये घुसले. शस्त्रधाऱयांनी मसिह यांच्या घरातील मुलांचा शोध घेतला. परंतु ते बाहेर असल्यामुळे घरातील तीन महिलांना त्यांनी मारहाण केली.

मारहाण केल्यानंतर या टोळक्यापने त्यांना विवस्त्र करून धिंड काढल्याची घटना तीन जून रोजी घडली आहे. यावेळी घरातील पुरुष आपापल्या कामासाठी बाहेर गेले होते. गावातून धिंड काढली त्यावेळी महिला मदतीसाठी ओरडत होत्या. गावातील काही ज्येष्ठ नागरिक मदतीसाठी पुढे येत होते. परंतु शस्त्रांमुळे नागरिक घाबरत होते. शेवटी गावातील नागरिक एकत्र आल्याने त्यांची सुटका झाली. याबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आलेय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 20, 2013 - 20:12
comments powered by Disqus