बेडकाचं सूप प्यायल्याने पती-पत्नीचा मृत्यू!

हृदयरोग आणि कँसरमुळे आजारी असणाऱ्या एका चीनी दाम्पत्याने आजारांवरील इलाज म्हणून बेडकाचं सूप प्यायलं. मात्र दुर्दैवाने तो बेडूक विषारी निघाल्याने दोघांचाही मृत्यू झाला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 30, 2013, 03:57 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बीजिंग
हृदयरोग आणि कँसरमुळे आजारी असणाऱ्या एका चीनी दाम्पत्याने आजारांवरील इलाज म्हणून बेडकाचं सूप प्यायलं. मात्र दुर्दैवाने तो बेडूक विषारी निघाल्याने दोघांचाही मृत्यू झाला.
चीनमध्ये बेडकाचं सूप हे पारंपरिक औषध मानलं जातं. अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणून बेडकाचं सूप पिण्याचा सल्ला दिला जातो. ठंड हवेच्या प्रदेशात आढळणारे बेडुक खाल्यामुळे ताप उतरतो. शरीरातील विषारी तत्वं कमी होतात. तसंच कँसर, ट्युमर सारख्या आजारांपासून मुक्ती मिळते.
आपली तब्येत बरी व्हावी, या आशेने चीनी कुटुंबाने शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून बेडूक मागवू घेतले. त्यांच्या मुलानेच आई- वडिलांना बेडूक आणून दिले. या बेडकांचं सूप आरोग्यासाठी हितवर्धक असल्याचा विश्वास असल्यानेचच दोघांनी हे सुप प्यायले. मात्र दुर्दैवाने तो विषारी निघाला. सूप पिऊन दोघांचीही तब्येत बिघडली. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र, दोघांचाही मृत्यू झाला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.