चमचमतं क्रिकेट करिअर सोडून त्या दोघांनी निवडली आर्मी

क्रिकेटच्या मैदानात त्यांच्यासाठी पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही होती. एक चमचमतं करिअर त्यांच्यासमोर असतांना त्या दोन भावांनी मात्र क्रिकेटचा ड्रेस उतरवून देशसेवा करण्यासाठी आर्मीचा पोशाख चढवला.    

PTI | Updated: Aug 2, 2014, 08:50 PM IST
चमचमतं क्रिकेट करिअर सोडून त्या दोघांनी निवडली आर्मी     title=

येरुशलम, इस्राइल: क्रिकेटच्या मैदानात त्यांच्यासाठी पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही होती. एक चमचमतं करिअर त्यांच्यासमोर असतांना त्या दोन भावांनी मात्र क्रिकेटचा ड्रेस उतरवून देशसेवा करण्यासाठी आर्मीचा पोशाख चढवला.    

देशाविषयी असलेल्या प्रेमानं क्रिकेट प्रेमावर मात केली. क्रिकेटमध्ये इस्राइलचं प्रतिनिधित्व केलेले दोन भारतीय वंशाचे भाऊ क्रिकेट सोडून आर्मीत भर्ती झालेत. हमास विरुद्ध सुरू असलेल्या संघर्षात ते सहभागी झाले असून देश सेवा करतायेत. 

रोनेन आणि शिफ्रोन वास्कर यांनी इस्राइल क्रिकेट लीगमध्ये आपल्या बॅटिंगच्या कौशल्यानं विरोधकांच्या नाकी दम आणला होता. आपल्या टीमला विजय मिळवून देण्यात या दोघांची प्रमुख भूमिका होती. मात्र जेव्हा ते आपलं हे शानदार प्रदर्शन करत होते तेव्हाच 8 जुलैला संघर्ष सुरू झाला. 

दोन्ही भावांमधील थोरला रोनेननं सांगितलं, “आमच्या दोन महत्त्वपूर्ण मॅच बाकी आहेत ज्या आमचं स्थान निश्चित करतील. मी टीम आण क्रिकेट खेळू शकणार नाही म्हणून चिंतेत होतो. मात्र जेव्हा येरुशलमजवळ संकट वाढत होतं. तेव्हा माझ्या मनात काहीच शंका उरली नाही,” त्यानं सांगितलं, “जेव्हा इस्राइलच्या तीन तरुणांचं अपहरण झालं आणि इथं तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा मी आपल्या सैन्यासोबत हेब्रोनच्या गुश एटसियोन भागात तैनात आहे”. तर शिफ्रोन गाजामध्ये फिलिस्तिनी दहशतवाद्यांसोबत लढतोय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.