मोस्ट वॉटेंड दाऊद पाकिस्तानात, पाकचीच कबुली

By Surendra Gangan | Last Updated: Saturday, August 10, 2013 - 07:07

www.24taas.com, झी मीडिया, लंडन
दाऊद इब्राहिमबाबत पाकिस्तानचं पितळ उघड झालं आहे. दाऊद पाकिस्तानातच होता, मात्र आता सौदी अरेबियात (युएईमध्ये) पळाला असावा, अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे विशेष दूत शहरयार खान यांनी दिली आहे.
अंडरवर्ल्ड डॉन आणि भारताला मोस्ट वॉ़टेंड असलेला दहशतवादी दाऊद इब्राहिम पाकिस्तानात होता अशी खळबळजनक कबुली पाकिस्तानं दिलीय. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव आणि पंतप्रधान नवाज शरीफ यांचे विशेष दूत शहरयार खान यांनी हा गौप्यस्फोट केलाय.
दाऊद आता अरब राष्ट्रांमध्ये असून युएईमध्येच लपला असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवलीय. दाऊदच्या वास्तव्याबाबत पाकिस्तान सरकारच्या बड्या अधिका-याकडून पहिल्यांदाच कबुली देण्यात आलीय. दहशतवाद्यांना थारा द्यायचा नाही असं पाकिस्तान सरकारचं धोरण आहे. त्यामुळे दाऊद पाकिस्तानात असता तर आजवर पकडला गेला असता अशी मल्लीथानी करायलाही ते विसरले नाहीत.

एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात भारतीय पत्रकारांसमोर बोलताना त्यांनी हा दाऊद इब्राहिम आपल्या देशात नाही असाच दावा पाकिस्तान सरकार आजवर करत आलंय, त्यामुळे शहरयार खान यांच्या या ताज्या खुलाशावर विश्वास बसणंही कठीण आहे. मात्र, मोस्ट वॉण्टेड कुख्यात दाऊद हा पाकिस्तानातच असल्याच्या भारताच्या दाव्याला पाकनेच पुष्टी दिली आहे.
पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सरकार गुन्हेगारांना संरक्षण देत नाही, असा दावा करताना शहरयार खान म्हणाले, दाऊद इब्राहिम पाकिस्तानात होता; पण मला वाटते आता तो पाकमध्ये नाही. दाऊदने संयुक्त अरब अमिरात, सौदीत आश्रय घेतला असावा. अटकेच्या भीतीने तो पाकच्या बाहेर गेला असावा.
दरम्यान, पाकिस्तानने पहिल्यांदाच दाऊद त्यांच्याकडे होता, याची कबुलीच दिली आहे. शहरयार खान हे शरीफ यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे त्यांनी पाक सरकारचीच भूमिका मांडली आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.First Published: Saturday, August 10, 2013 - 07:00


comments powered by Disqus