दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा सापडला

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा सापडला असल्याची माहिती, पश्चिमेतील गुप्तहेर संघटनेनं दिली आहे. या गुप्तहेर संघटनेनं दाऊद इब्राहिमचा आवाज टॅप केला आहे.कराचीतील पॉश क्लिफ्टन भागात दाऊद लपल्याचा या गुप्तहेर संघटनेनं म्हटलंय.

Updated: Dec 26, 2014, 11:11 PM IST
दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा सापडला title=

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा सापडला असल्याची माहिती, पश्चिमेतील गुप्तहेर संघटनेनं दिली आहे. या गुप्तहेर संघटनेनं दाऊद इब्राहिमचा आवाज टॅप केला आहे.कराचीतील पॉश क्लिफ्टन भागात दाऊद लपल्याचा या गुप्तहेर संघटनेनं म्हटलंय.

दाऊदच्या संभाषणाची जवळपास ३० मिनिटांची टेप आहे, यात दाऊदच्या आवाजावरून तो आता म्हातारा झालाय, कोणत्या देशात प्रशासनाला पैसे देऊन कशी गुंतवणूक करायची याविषयीचे धडे या टेपमध्ये दाऊद इब्राहिम देतोय.

या टेपमुळे पाकिस्तानात दाऊद नाही, असं सांगणाऱ्या पाकिस्तानच्या डोळ्यात झंझणीत अंजन भारताला घालता येणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.