कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला नव्हता...

अमेरिकेचा शोधकर्ता म्हणून क्रिस्तोफर कोलंबस हे नाव आपल्याला माहित असेलचं. 

Updated: Jul 14, 2015, 04:26 PM IST
कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला नव्हता... title=

लंडन : अमेरिकेचा शोधकर्ता म्हणून क्रिस्तोफर कोलंबस हे नाव आपल्याला माहित असेलचं. 

पण नवीन आलेल्या पुराव्यानुसार चीनच्या शोधकर्त्यांनी याआधीचं अमेरिकेचा शोध लावला होता. 
सध्या सापडलेल्या प्राचीन शिलालेखांमधून असे कळून येते कि चिनी शोधकर्त्यांनी युरोपीयन शोधकर्त्यांच्या खूप आधीचं अमेरिकेचा शोध लावला होता.
 
'डेली मेल'च्या वृत्तानुसार अमेरिकेच्या इलिनॉयमधील एक सेवानिवृत्त रसायनशास्त्रज्ञ तसेच हौशी शिलालेख संशोधक जॉन रसकैंप यांनी न्यू मेक्सिकोमधील अल्बुबर्कच्या पेट्रो ग्लफ राष्ट्रीय स्मारकाला फेरफटका मारताना असामान्य अशा चिन्हांचा शोध घेतला. 

या चिन्हांवरून असे कळून येते कि एशियामधील प्राचिन लोक यांनी ई.पू. 1,300 म्हणजेच 1492 मध्ये कोलंबसने शोध लावण्यापूर्वी जवळजवळ 2800 वर्षांपूर्वी शोध लावला होता असा दावा केला आहे.

उत्तर अमेरिकामध्ये असलेले हे प्राचीन चिनी लेखन बनावट असू शकत नाही कारण ह्या लिखाणची शैली खूपच प्राचीन आहे.

वैज्ञानिक अभ्यासात असे सिद्ध होते कि प्राचीन चीनी लोक 2500 वर्षांपूवी स्थानिक लोकांबरोबर मिसळले होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.