वेगवेगळ्या रंगाची, आकाराची थ्रीडी भातशेती

चायनीज वस्तू म्हटलं की नाकं मुरडायची आपणाला जणू सवयच लागलीय. पण आता आम्ही जे तुम्हाला दाखवणार आहोत, ते पाहून तुम्ही थक्क व्हाल. चिनी माणसाची कल्पनाशक्ती किती अचाट आणि अद्भूत आहे.

Reuters | Updated: Jun 25, 2015, 09:45 PM IST
वेगवेगळ्या रंगाची, आकाराची थ्रीडी भातशेती title=

बीजिंग : चायनीज वस्तू म्हटलं की नाकं मुरडायची आपणाला जणू सवयच लागलीय. पण आता आम्ही जे तुम्हाला दाखवणार आहोत, ते पाहून तुम्ही थक्क व्हाल. चिनी माणसाची कल्पनाशक्ती किती अचाट आणि अद्भूत आहे.

चिनी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात काय पिकवलंय?अत्यंत आकर्षक अशी ही थ्री डी चित्रं सध्या चीनमधल्या शेनयांग प्रांतातल्या शेतांमध्ये पिकतायत. खरं तर ही चित्र नाहीत, तर ती आहेत भाताची शेतं.

वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या आकाराची ही भातशेती अशाप्रकारं लावण्यात आलीय, की त्यातून थ्री डी चित्रांसारखं सुरेख, नयनरम्य दृश्य दिसतं. गेल्यावर्षीच शेनयांग प्रांतात दाव मेंग काँग जियान नावाचं हे थीम पार्क सुरू झालंय. तब्बल ८० फुटबॉल मैदानांच्या आकाराएवढ्या साडे चार लाख चौरस मीटर क्षेत्रात ही पॅडी कला साकारण्यात आली आहे.

विशेष म्हणजे दरवर्षी अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शेतक-यांना विविधरंगी शेतं तयार करायला सांगितलं जातं. शेनयांग प्रांतात राहणारे सायबे जातीचे लोक या धान्य कलेत पारंगत आहे. चिनी देवादिकांना प्रसन्न करण्यासाठी ते आपल्या शेतात अशाप्रकारची धान्यचित्रे वर्षानुवर्षापासून उगवत आहेत. धान्यचित्रं हे इथलं खास आकर्षण असलं तरी लग्न सोहळ्यासाठी आणि पिकनिकसाठीही ही धान्य चित्र शेतं फेमस आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.