डोनाल्ड ट्रम्प यांनी चुकवला तीन कोटींचा टॅक्स, व्हाईट हाऊसची माहिती

Last Updated: Wednesday, March 15, 2017 - 16:53
डोनाल्ड ट्रम्प यांनी चुकवला तीन कोटींचा टॅक्स, व्हाईट हाऊसची माहिती

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी २००५ साली अमेरिकेचा जवळपास ३ करोड अमेरिकन डॉलर्सचा टॅक्स चुकवला असल्याचं व्हाईट हाऊसच्या अहवालातून समोर येतंय.

व्हाईट हाऊसनं दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी २००५ साली १५ करोड अमेरिकी डॉलर्सची कमाई केली. मात्र त्यांनी ३.८ करोड अमेरिकन डॉलर्सचा टॅक्स चुकवला. एका लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमात या मुद्द्यावर चर्चा झाल्यानंतर व्हाईट हाऊसला ही माहिती उघड करावी लागलीय.

या कार्यक्रमामध्ये निवेदकाने ट्रम्प यांच्या २००५ सालच्या आयकर तसंच संपत्ती जाहीर करण्याच्या फॉर्मचा खुलासा केला होता. यानंतर व्हाईट हाऊसला यावर स्पष्टीकरण द्यावं लागलंय. 

ही माहिती शोधण्यामागे कोणाचा काय हेतू होता आणि त्यांनी ही माहिती कुठून मिळवली? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र व्हाईट हाऊसने त्यावर कडक शब्दांत टीका केली आहे.

कुणाच्या अशा खाजगी कागदपत्रांची जाहीर वाच्यता करणं अवैध आहे. टॅक्स रिटर्नची चोरी आणि प्रकाशन करणं कायद्यानं गुन्हा आहे. माध्यमं अशा बातम्या आपल्या फायद्यासाठी जाहीर करतील. मात्र राष्ट्रपतींना आता संपूर्ण देशाकडे लक्ष द्यायचं आहे. ते अमेरिकन लोकांसाठी काम करण्याकडे लक्ष देत आहेत, असं म्हणत व्हाईट हाऊसनं माध्यमांना फटकारलंय.

कार्यक्रमाच्या निवेदकाच्या म्हणण्यानुसार, 'ही महत्त्वाची कागदपत्रं त्यांना एका पुलित्झर पुरस्कार विजेत्या पत्रकाराकडून मिळाली आणि ते स्वत: एक वृत्तसंस्था सांभाळत आहेत'.

 

 

First Published: Wednesday, March 15, 2017 - 16:44
comments powered by Disqus