फेक प्रोफाईल असल्यास दाखल होणार गुन्हा ?

सोशल नेटवर्किंगवर फेक प्रोफाईल बनवून इतरांना त्रास देणऱ्यांविरोधात इंग्लंडमध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो.

Updated: Mar 3, 2016, 10:32 PM IST
फेक प्रोफाईल असल्यास दाखल होणार गुन्हा ? title=

लंडन: सोशल नेटवर्किंगवर फेक प्रोफाईल बनवून इतरांना त्रास देणऱ्यांविरोधात इंग्लंडमध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो. या नव्या कायद्याचा प्रस्ताव इंग्लंडमध्ये विचारात आहे. 

महिलांवर होणारे अत्याचारांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे, त्यातले बरेच अत्याचार हे फेक प्रोफाईलमुळे होत असल्याचं इंग्लंडच्या सुरक्षा यंत्रणांच्या लक्षात आलं, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.  

फेसबूकवर कोणी फेक प्रोफाईल तयार केलं तर ते एकाऊंट रिपोर्टकरून फेसबूककडून ते प्रोफाईल डिलीट केलं जातं, तर ट्विटरच्या पॉलीसीनूसारही अशी अकाऊंट्स डिलीट करण्यात येतात. 

पण यूजर्सना आपल्या चाहत्यांचं पेज बनवण्याबाबत मात्र फेसबूक आणि ट्विटरच्या पॉलीसी वेगळ्या आहेत.