पाहा... राजकुमाराची पहिली झलक!

By Shubhangi Palve | Last Updated: Wednesday, July 24, 2013 - 16:31

www.24taas.com, झी मीडिया, लंडन
प्रिन्स विल्यम्स आणि त्यांची पत्नी केट मिडलटन यांना नुकतीच पुत्ररत्नाची प्राप्ती झालीय. साहजिकच, त्यामुळे ब्रिटनमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलंय.
शाही राजमुकूटाच्या नव्या वारसदाराची पहिली झलक पाहण्यासाठी लोकांनी हॉस्पीटलबाहेर एकच गर्दी केली होती. मीडियामुले लगेचच या छोट्या राजकुमाराचा फोटोही लोकांसमोर आलाय.

प्रिन्स विल्यम्स आपल्या चिमुकल्या राजकुमारकडे एक नजर टाकून म्हणतात, ‘आमच्यासाठी यापेक्षा मोठा आनंद आणखी काय असू शकतो’. ३१ वर्षीय ‘डचेस ऑफ केंब्रिज’ केटनं काल संध्याकाळी स्थानिक वेळनुसार ४ वाजून २४ मिनिटांनी लंडनस्थित सेंट मेरी हॉस्पीटलमध्ये खाजगी ‘लिंडो विंग’मध्ये आपल्या बाळाला जन्म दिला. ब्रिटनच्या या नव्या राजकुमाराचं नामकरण मात्र अद्याप झालेलं नाही.

फोटोफीचर राजपुत्राच्या जन्माचा उत्सव!

विल्यम्स यांनी लोकांशी बोलताना, राजकुमार आपल्या आईसारखाच दिसत असल्याचं म्हटलंय तर केट यांनी हा अनुभव अवर्णनीय असल्याचं म्हटलंय.

चांदीच्या नाण्यांचं वाटप
राजकुमाराच्या जन्माच्या आनंदात शाही घराण्यानं २०१३ नवजात बालकांना चांदीचे नाणी देणार असल्याचं जाहीर केलंय. केंब्रिजच्या नव्या प्रिन्सचा जन्म ज्या दिवशी झाला त्याच दिवशी जन्मलेल्या बालकांना ही चांदीची ‘लकी’ नाणी देण्यात येणार आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, July 24, 2013 - 13:25
comments powered by Disqus