अमेरिकेतला हा हल्ला दहशतवादी-ओबामा

अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये झालेला हल्ला हा दहशतवादी हल्ला असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिली आहे.

Updated: Jun 13, 2016, 07:55 AM IST
अमेरिकेतला हा हल्ला दहशतवादी-ओबामा title=

फ्लोरिडा : अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये झालेला हल्ला हा दहशतवादी हल्ला असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिली आहे. या हल्ल्याची FBI संपूर्ण चौकशी करणार आहे. या हल्ल्याविरोधात अमेरिका एकजूट असल्याचंही ओबामा म्हणाले आहेत. दरम्यान आयसीस या दहशतवादी संघटनेनं फ्लोरिडामध्ये झालेल्या हा हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. 

अमेरिकेतील फ्लोरिडाच्या ऑरलँडोमधल्या गे नाईटक्लबमध्ये एका व्यक्तीनं केलेल्या अंदाधूंद गोळीबारात 50 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 53 जण जखमी झालेत. नाईट क्लबमध्ये घुसून हल्लेखोरानं तिथं जमलेल्या लोकांना बंधक बनवलं, त्यानंतर या हल्लेखोरांनं अनेक निरपराधांचा बळी घेतला. 

या घटनेनंतर ऑरलँडो पोलिसांनी केलेल्या ऑपरेशनमध्ये हल्लेखाराला कंठस्नान घालण्यात आलं आहे. हल्लेखोराचं नाव उमर मतीन असून तो अफगाण वंशिय अमेरिकन नागरिक असल्याचं सांगण्यात येतं आहे. 

ऑरलँडो शहरात गेल्या 24 तासातली ही दुसरी गोळीबाराची घटना आहे. याआधी शुक्रवारी एका थिएटरमध्ये एका बंदूकधारी हल्लेखोरानं गायिका क्रिस्टिना ग्रिमी हिची हत्या केली होती. या दोन्ही घटनानंतर ऑरलँडोमध्ये इमरजन्सी लागू करण्यात आली आहे. 9/11 नंतरचा अमेरिकेवरील हा सर्वात मोठा हल्ला आहे.