...हे माहीत पडल्यानंतर चिकन खाणं तुम्ही सोडून द्याल!

'केएफसी' (केंटकी फ्राईड चिकन) आपल्या नॉन व्हेज पदार्थांसाठी खूप प्रसिद्ध आहे... पण, सध्या हेच केएफसी वादात सापडलंय. 

Updated: Jan 19, 2016, 03:47 PM IST
...हे माहीत पडल्यानंतर चिकन खाणं तुम्ही सोडून द्याल! title=

नवी दिल्ली : 'केएफसी' (केंटकी फ्राईड चिकन) आपल्या नॉन व्हेज पदार्थांसाठी खूप प्रसिद्ध आहे... पण, सध्या हेच केएफसी वादात सापडलंय. 

नुकतंच, केएफसीच्या चिकन पॉपकॉर्नच्या आता माश्यांचे अंडे सापडलेत... अत्यंत किळसवाणा हा प्रकार साराह जेन विल्यम्स नावाच्या केएफसीच्या एका ग्राहकानं फेसबूकवर शेअर केलाय. 'आता मी पुन्हा कधीही केएफसीमध्ये जाणार नाही' असंही तिनं पुढे म्हटलंय. न्यूझीलंडमध्ये हा प्रकार उघडकीस आलाय. 

This is what I just got from KFC pukekohe. I wont be going back there in awhile.

Posted by Sarah-jane Williams on Thursday, January 14, 2016

उल्लेखनीय म्हणजे, याआधीही कॅलिफोर्नियामध्ये एका व्यक्तीनं केएफसीनं चिकनऐवजी उंदीर फ्राय करून आपल्याला दिल्याचा दावा केला होता. परंतु, केएफसीनं हा दावा फेटाळून लावला होता.