खुशखबर...स्वस्त होऊ शकते पेट्रोल-डिझेल

इराणने तेल उत्पादन दररोज ५ लाख बॅरलने वाढविण्याच्या वक्त्व्यानंतर आणि चीनच्या औद्योगिक उत्पादनात मोठी घट यामुळे आज आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईल ६ महिन्यांची निच्चांक पातळी गाठली आहे. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल-डिझेल स्वस्त होऊ शकते. 

Updated: Aug 4, 2015, 07:00 PM IST
खुशखबर...स्वस्त होऊ शकते पेट्रोल-डिझेल title=
Fuel price decreases

सिंगापूर : इराणने तेल उत्पादन दररोज ५ लाख बॅरलने वाढविण्याच्या वक्त्व्यानंतर आणि चीनच्या औद्योगिक उत्पादनात मोठी घट यामुळे आज आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईल ६ महिन्यांची निच्चांक पातळी गाठली आहे. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल-डिझेल स्वस्त होऊ शकते. 

सिंगापूरच्या बाजारात ब्रेंट क्रूड ऑईल ५१.५० डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आले आहे. या फेब्रुवारीच्या सुरूवातीनंतर हा पहिल्यांदा निच्चांकी पातळी गाठली आहे. यानंतर यात थोडा सुधार दिसला गेल्या सत्राच्या तुलनेत ५० सेंट खाली जाऊन ५१.७१ डॉलर प्रति बॅरलवर राहिला. अमेरिकेतील क्रूड ऑइलची किंमत ४६.७३ डॉलर प्रति बॅरल खाली आला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.