सोन्याच्या कारमधून फिरायचं स्वप्न करा पूर्ण

दुबईतल्या ऑटो शोमध्ये सोन्यापासून बनवलेली कार ठेवण्यात आली आहे.

Updated: May 11, 2016, 04:04 PM IST
सोन्याच्या कारमधून फिरायचं स्वप्न करा पूर्ण title=

दुबई: दुबईतल्या ऑटो शोमध्ये सोन्यापासून बनवलेली कार ठेवण्यात आली आहे. सोन्याची ही कार ऑटो शोमध्ये सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. गॉडझिला असं या कारचं नाव असून ती कुह्ल रेसिंग ग्रुप या कंपनीनं बनवली आहे. 

या कारची किंमत 10 लाख डॉलर म्हणजेच 6 कोटी 65 लाख 77 हजार एवढी आहे. निसान आर 35 जीटी आर रेसिंग कारला मढवून ही सोन्याची कार बनवण्यात आली आहे.  

या कारला 545 एचपी पॉवरचं टर्बो इंजिन बसवण्यात आलं आहे. ऑटोमॅटिका दुबई या कार एक्स्पोमध्ये ही कार ठेवण्यात आली आहे. 

पाहा सोन्याच्या या कारचा व्हिडिओ