यूएईमध्ये बोलले मोदी - लाज वाटते आम्ही ३४ वर्ष वाया घालवले

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पुन्हा एकदा परदेशी भूमीवर माजी सरकारला टीकेचे लक्ष्य केले. संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी कॉर्बन सिटी मसदरमध्ये उद्योगपतींसमोर बोलताना पंतप्रधान म्हणाले आपण ३४ वर्ष वाया घालविले. यामुळे मला लाज वाटत आहे. दुसरीकडे पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने टीका केली आहे. 

Updated: Aug 17, 2015, 06:46 PM IST
यूएईमध्ये बोलले मोदी - लाज वाटते आम्ही ३४ वर्ष वाया घालवले title=

मसदर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पुन्हा एकदा परदेशी भूमीवर माजी सरकारला टीकेचे लक्ष्य केले. संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी कॉर्बन सिटी मसदरमध्ये उद्योगपतींसमोर बोलताना पंतप्रधान म्हणाले आपण ३४ वर्ष वाया घालविले. यामुळे मला लाज वाटत आहे. दुसरीकडे पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने टीका केली आहे. 

मसदर शहरात उद्योगपती नेत्यांसमोर बोलताना मोदी म्हणाले, भारत आणि यूएई दरम्यान ७०० उड्डाण आहेत पण आपण ३४ वर्ष वाया घालविली?  यासाठी मला लाज वाटत आहे. मला खडतरता वारसा म्हणून मिळाली आहे. मी यापासून पळू शकत नाही. मी चांगल्या गोष्टी घेऊन आणि त्या वाईट गोष्टी सोडून देऊ असं होऊ शकत नाही. काही गोष्टी (मागील) सरकारांनी अनिर्णय आणि सुस्तीमुळे थांबल्या होत्या. त्या गोष्टी पुन्हा सुरू करणे माझी प्राथमिकता असेल.

यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रवक्ता संजय झा यांनी ट्विट केले की, 'हे निंदनीय आहे. पंतप्रधान मोदी परदेशी भूमीवर विरोधी पक्षावर सतत करत असलेल्या टीका अशोभनिय आहेत. आणि खूप लज्जास्पद आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.