जगातील सर्वात उंच दाम्पत्य, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

चीनमधील विवाहित दाम्पत्य सुन मिंग मिंग आणि शू यान यांनी जगातील सर्वात उंच जोडी असल्याचा दावा केलाय. त्यांनी आपला दावा खरा असल्याचे सांगण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मुख्यालयाकडून देण्यात आलेले प्रमाणपत्र दिले आहे.

Reuters | Updated: Sep 13, 2015, 11:45 AM IST
जगातील सर्वात उंच दाम्पत्य, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद title=
(छाया : guinnessworldrecords)

लंडन : चीनमधील विवाहित दाम्पत्य सुन मिंग मिंग आणि शू यान यांनी जगातील सर्वात उंच जोडी असल्याचा दावा केलाय. त्यांनी आपला दावा खरा असल्याचे सांगण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मुख्यालयाकडून देण्यात आलेले प्रमाणपत्र दिले आहे.

या नव दाम्पत्यांने लंडनचा त्यासाठी दौरा केला. त्यानुसार त्यांची सर्वात उंच जोडपे असल्याची नोंद गिनीज बुकने केलेय. त्यानुसार सुन मिंग मिंग आणि शू यान यांना तसे प्रमाणपत्र दिलेय. यामध्ये यांची एकत्रित उंची ४२३.४७ सेंटीमीटर ( म्हणजेच १३ फूट, १०.७२ इंच) आहे.

२००९मध्ये चीनच्या नॅशनल गेम्स येथे दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले. त्यानंतर या दोघांनी ४ ऑगस्ट २०१३ रोजी लग्न केले.

या दोघांची उंची चीनच्या माजी बास्केटबॉल खेळाडू याओ मिंग आणि त्याची पत्नी यी ली यांच्यापेक्षा जास्त आहे. याओ आणि यी ली यांची एकत्रित उंची ४१६ सेंटीमीटरच्या जवळपास आहे.

शूने सांगितले, ज्यावेळी मी पतीला पाहिले त्यावेळी मी आश्चर्य़चकीत झाले. मी म्हटलं लोक इतके उंच असू शकतात का? तसेच सुनने सांगितले, आम्हाला रोज काहीही काही समस्या येतात. कार किंवा विमानातून प्रवास करताना तसेच हॉटेलमध्ये गेल्यानंतर उंचीची समस्या येते. मात्र, आता मला त्याची सवय झाली आहे.

 

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे मुख्य संपादक क्रेग ग्लेंडे यांनी या सर्वात उंच जोडीची योग्य उंची मोजली. गिनीजने दिवसातून तीन वेळा या उंच जोडीची उंची मोजली. त्यानंतर ग्लेंडे यांनी सांगितले, आमचा गेल्या ६० वर्षांपासूनचा उद्देश आहे जगातील अद्भूत आणि अनोखे प्रकार दाखविणे हे आहे. आमचा उद्देश केवळ बातम्या गोळा करणे नाही. दरम्यान, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा २०१६ नविन अंक प्रसिद्ध झालाय.

(सौजन्य: guinnessworldrecords.com)

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.