हाफीज सईद बॉम्बस्फोटात ठार

इस्लामिक स्टेट इर्थात इसिसचा पाकिस्तान प्रमुख हाफीज मोहम्मद सईदचा बॉम्बस्फोटात ठार झाल्याचं समजतंय. पाकिस्तानच्या पश्चिमोत्तर कबायली भागात रस्त्यालगत बॉम्ब ठेवत असताना त्याचा मृत्यू झाला आहे.

Updated: Apr 17, 2015, 05:45 PM IST
हाफीज सईद बॉम्बस्फोटात ठार title=

पेशावर : इस्लामिक स्टेट इर्थात इसिसचा पाकिस्तान प्रमुख हाफीज मोहम्मद सईदचा बॉम्बस्फोटात ठार झाल्याचं समजतंय. पाकिस्तानच्या पश्चिमोत्तर कबायली भागात रस्त्यालगत बॉम्ब ठेवत असताना त्याचा मृत्यू झाला आहे.

एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सईद त्याच्या दोन साथीदारांसोबत कबायलीमधील तिराह भागातील तूर दारा भागात बॉम्ब ठेवत होते. मात्र, त्याच वेळी बॉम्बचा स्फोट झाला. त्यामध्ये एक व्यक्ती ठार झालाय. ठार झालेली व्यक्ती इसिसचा पाकिस्तान प्रमुख असल्याचा सुरक्षा रक्षकांचा दावा आहे. याबद्दल कोणतही स्पष्टीकरण इसिसकडून देण्यात आलेलं नाही.

औरकजई एजेंसी येथे राहणारा सईद पाकिस्तानच्या टिटिपी (तहरीक ए तालिबान पाकिस्तान) संघटनेच्या पाच प्रमुखांपैंकी एक होता. टीटीपीचा माजी प्रवक्ता शहिदुल्ला शाहिदच्या नेतृत्वात ही संघटना आयएसमध्ये विलीन करण्यात आली होती. आयएसने मागील वर्षी सईदला पाकिस्तानचा आयएस प्रमुख म्हणून घोषित केलं होतं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.