'बिल क्लिंटन घरगुती हिंसाचाराचे बळी; हिलरींनी अनेकदा केली मारहाण'

अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दमदार दावेदारांपैंकी इतरांहून जास्त प्रभावी ठरतायत त्या अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी 'हिलरी क्लिंटन'...

Updated: Oct 7, 2015, 11:28 AM IST
'बिल क्लिंटन घरगुती हिंसाचाराचे बळी; हिलरींनी अनेकदा केली मारहाण' title=

नवी दिल्ली : अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दमदार दावेदारांपैंकी इतरांहून जास्त प्रभावी ठरतायत त्या अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी 'हिलरी क्लिंटन'...

सध्या हिलेरी जास्त चर्चेत आहेत ते त्यांच्याविषयी केल्या जाणाऱ्या निरनिराळ्या दाव्यांमुळे... एका पुस्तकात तर अमेरिकेची ही माजी फर्स्ट लेडी आपल्या राष्ट्रपती पदावरच्या पतीला म्हणजेच बिल क्लिंटन यांना मारहाण करत होत्या, असा दावा करण्यात आलाय. 

राग अनावर झाल्यानंतर हिलरी या खूपच आक्रमक पवित्रा घेत आणि कधी कधी हिंसकही होत. अनेकदा त्यांनी बिल क्लिंटन यांच्यावर पुस्तकं, अॅश ट्रे अशा वस्तूही फेकून मारल्यात. इतकंच नाही, तर त्यांनी बिल क्लिंटन यांच्या थोबाडातही ठेऊन दिलीय, असं या पुस्तकात म्हटलं गलंय.

या पुस्तकाचं नाव आहे 'द क्लिंटन वॉर ऑन वुमेन'.... राजनैतिक सल्लागार रॉजर स्टोन यांनी हे पुस्तक लिहिलंय. हिलरी क्लिंटन यांच्या स्वभावाविषयी हे पुस्तक अनेकदा भाष्य करतंय. 

न्यूयॉर्क डेली टाइम्स आणि डेली मेलमध्ये छापण्यात आलेल्या बातमीनुसार, लेखकानं दावा केलाय की हिलरी आपल्या पतीला मारहाण करत होत्या. त्यांनी अनेक वस्तू आपल्या पतीवर फेकून त्यांच्यावर हल्लाही केलाय. नखांनीही ओरबाडलंय... इतकं की अनेकदा या ओरबाडण्याच्या खुना बिल क्लिंटन यांच्या शरीरावर स्पष्ट दिसत होत्या. 

स्टोन यांच्या म्हणण्यानुसार, बिल क्लिंटन हे अनेकदा घरगुती छळवणुकीचे बळी ठरलेत. या पुस्तकात हिलरी यांच्याभोवती फिरणाऱ्या अनेक अफवांचा उहा-पोह केला गेलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.