पाकिस्तानमध्ये हिंदू विवाह कायदा मंजूर

 पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी पाकिस्तानमध्ये असलेल्या अल्पसंख्यांक हिंदूंच्या विवाह नियमांविषयी विधेयकाला संमती दिल्यानंतर आज त्याविषयी कायदा मंजूर करण्यात आला आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 20, 2017, 07:51 PM IST
पाकिस्तानमध्ये हिंदू विवाह कायदा मंजूर

इस्लामाबाद :  पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी पाकिस्तानमध्ये असलेल्या अल्पसंख्यांक हिंदूंच्या विवाह नियमांविषयी विधेयकाला संमती दिल्यानंतर आज त्याविषयी कायदा मंजूर करण्यात आला आहे. 

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या सल्ल्यातून पाकिस्तानच्या इस्लामी गणराज्यने हिंदू विवाह विधेयक २०१७ ला मंजुरी दिली आहे.

या कायद्याचा हेतु हिंदू परिवारांच्या अधिकारांचे संरक्षण करून हिंदू परिवार, महिला, बालक यांना संरक्षण देणे हा आहे. या कायद्यानुसार पाकिस्तानमधील हिंदू आपल्या परंपरेनुसार लग्न सोहळा पार पाडू शकतील.