...इथे मिळते राशींवरून नोकरी!

‘तुमची रास कोणती?’ असा प्रश्न तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी मुलाखतीच्या वेळी विचारली गेली तर... तुम्ही अवाक नक्कीच व्हाल...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 31, 2013, 01:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बीजिंग
‘तुमची रास कोणती?’ असा प्रश्न तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी मुलाखतीच्या वेळी विचारली गेली तर... तुम्ही अवाक नक्कीच व्हाल... पण, चिनमध्ये आता हे बरंच ओळखीचं झालंय. चीनमध्ये उमेदवारांना त्यांच्या ग्रहांवरून आणि राशींच्या माहितीवरुन मुलाखत आणि नोकरीसाठी बोलावलं जातंय.
‘फक्त मिथुन, तुळ आणि कुंभी राशीच्या व्यक्तींचीच गरज आहे’ असा उल्लेख एक ट्रॅव्हल एजन्सीनं आपल्या जाहीरतीत केलाय. चीनच्या लियाओनिंग प्रांतांतून निघणाऱ्या `बंडाओ मॉर्निंग न्यूज` या वृत्तपत्रानं ही माहिती दिलीय. यावरून तुमच्या लक्षात येईल की चीनमध्ये रास किती महत्त्वाची मानली जातेय.
केवळ एकच व्यक्ती किंवा संस्थेचा हा विचार असू शकतो, असंही तुम्हाला वाटेल पण, शू जिंगपिन नावाच्या एका कॉलेज ग्रॅज्युएट विद्यार्थ्याला रिकाम्या हातानं परत फिरावं लागलं कारण त्याचे ग्रह कंपनीच्या शर्यतीनुसार नव्हते. इथं अनेक ठिकाणी लोकांच्या राशीनुसार त्यांचा विचार केला जातो.

हाँगकाँगचे वृत्तपत्र `साऊथ चीन मॉर्निंग पोस्ट`चे एमी ली यांनी रासभेदाविरुद्ध आवाज उठवलाय. ली म्हणतात ‘चीनमध्ये पश्चिमी ज्योतिषशास्त्राची लोकप्रियता बरीच वाढतेय. इंटरनेटवर बरेच ब्लॉगर्स आहेत, ते याबद्दल लिहितात आणि वाचतात आणि त्यांच्या समर्थकांचीही कमी नाही. चीनमध्ये योग्य कायद्याच्या अभावामुळे याप्रकारचा भेदभाव रोखणं खूपच कठिण आहे’.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.