पाहा, भारतीय पुरुष किती वेळ देतात घरातील कामांसाठी!

घरातील कामात महिलांना मदत करण्यात कोणत्या देशातील पुरुष सर्वांत पुढे आहेत? असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? 'इकोनॉमिक को-ऑपरेशन अॅन्ड डेव्हलपमेंट डेटा'नं केलेल्या सर्वेक्षणामध्ये स्लोव्हेनिया हा देश सर्वांत पुढे आहे. या देशातील पुरुष रोज सरासरी ११४ मिनिटं घरातील कामं करताना आढळतात. 

Updated: Mar 21, 2015, 08:45 PM IST
पाहा, भारतीय पुरुष किती वेळ देतात घरातील कामांसाठी! title=

मुंबई : घरातील कामात महिलांना मदत करण्यात कोणत्या देशातील पुरुष सर्वांत पुढे आहेत? असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? 'इकोनॉमिक को-ऑपरेशन अॅन्ड डेव्हलपमेंट डेटा'नं केलेल्या सर्वेक्षणामध्ये स्लोव्हेनिया हा देश सर्वांत पुढे आहे. या देशातील पुरुष रोज सरासरी ११४ मिनिटं घरातील कामं करताना आढळतात. 

या लिस्टमध्ये भारत सर्वांत खालच्या थरावर आहे... भारतीय पुरुष आपल्या दिवसातील अत्यंत कमी वेळ घरातील कामासाठी खर्च करतात, असं आढळून आलंय. भारतातील पुरुष रोज केवळ १९ मिनिटं घरातील कामं करतात. 

पाहुयात, कोणत्या देशातील पुरुष किती वेळ घरातील कामांसाठी देतात, त्याची यादी... 

१) स्लोव्हेनियातील पुरुष रोज सरासरी ११९ मिनिटं आणि महिला २१२ मिनिटं घरातील कामं करतात.

२) डेन्मार्कमधील पुरुष रोज सरासरी १०७ मिनिटं आणि महिला १४५ मिनिटं घरातील कामं करतात.

३) फ्रान्समधील पुरुष रोज सरासरी ९८ मिनिटं आणि महिला १५८ मिनिटं घरातील कामं करतात.

४) ऑस्ट्रेलियातील पुरुष रोज सरासरी ९३ मिनिटं आणि महिला १६८ मिनिटं घरातील कामं करतात.

५) जर्मनीतील पुरुष रोज सरासरी ९० मिनिटं आणि महिला १६४ मिनिटं घरातील कामं करतात.

६) अमेरिकेतील पुरुष रोज सरासरी ८२ मिनिटं आणि महिला १२६ मिनिटं घरातील कामं करतात.

७) दक्षिण अफ्रीकेतील पुरुष रोज सरासरी ६९ मिनिटं आणि महिला २०० मिनिटं घरातील कामं करतात.

८) ब्रिटेनमधील पुरुष रोज सरासरी ६६ मिनिटं आणि महिला १३३ मिनिटं घरातील कामं करतात.

९) आर्यलंडमधील पुरुष रोज सरासरी४९ मिनिट आणि महिला १३५ मिनिट घरातील काम करतात.

१०) या लिस्टमध्ये सर्वांत शेवटी भारताचा नंबर लागतो. भारततील पुरुष रोज सरासरी १९ मिनिटं आणि महिला २९८ मिनिट घरातील कामं करताना आढळून आलेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.