अशी मिळाली ओसामाला ९/११ च्या हल्ल्यासाठी 'प्रेरणा'

जेरुसलेम : अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या नव्या दाव्यानुसार, ओसामा बिन लादेनला १९९९ साली झालेल्या इजिप्त एअरलाइनच्या विमान दुर्घटनेतून ९/११ च्या अमेरिकेतील 'वर्ल्ड ट्रेड सेंटर'वरील हल्ल्यासाठी प्रेरणा मिळाली होती.

Updated: Feb 4, 2016, 02:43 PM IST
अशी मिळाली ओसामाला ९/११ च्या हल्ल्यासाठी 'प्रेरणा' title=

जेरुसलेम : अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या नव्या दाव्यानुसार, ओसामा बिन लादेनला १९९९ साली झालेल्या इजिप्त एअरलाइनच्या विमान दुर्घटनेतून ९/११ च्या अमेरिकेतील 'वर्ल्ड ट्रेड सेंटर'वरील हल्ल्यासाठी प्रेरणा मिळाली होती. 'अल - मसराह' या त्यांच्या साप्ताहिकातील 'सप्टेंबर ११ अटॅक्स - द स्टोरी अनटोल्ड' या लेखात हा दावा केला गेला आहे.  

१९९९ साली इजिप्त्शियन एअरलाइनच्या एका पायलटने जाणून-बुजून आपले विमान अटलांटिक महासागरात बुडवले होते. हे विमान लॉस एन्जेलिसहून कैरोला येत होते. या दुर्घटनेत २१७ जणांचा मृत्यू झाला होता... यात १०० अमेरिकन नागरिकांचाही समावेश होता.

जेव्हा ओसामा बिन लादेनने या घटनेविषयी ऐकले तेव्हा तो म्हणाला 'त्या पायलटने जवळपासच्या एखाद्या इमारतीवर ते विमान का नाही धडकलं?'

त्या पायलटच्या नातेवाईकांच्या मते एअरलाईनने पायलटविरुद्ध केलेल्या कारवाईचा बदला म्हणून त्याने ही दुर्घटना घडवून आणली. ओसामाला मात्र या गोष्टींमध्ये रस नव्हता.... त्याला रस होता तो अशा घटनांमधून होणाऱ्या विध्वंसाबद्दल... 

९/११ च्या हल्ल्याचा कट रचणाऱ्या शेख खालिद मोहम्मदला त्याने ही कल्पना पहिल्यांदा ऐकवली आणि मग त्याने हा कट रचला. प्राथमिक स्तरावर एकाच वेळेस १२ विमाने आदळवण्याचा हा कट होता. पण, शेवटी दोन विमानांचे अपहरण करुन हा हल्ला केला गेला.

इस्राईलच्या 'जेरुसलेम पोस्ट' या वृत्तपत्राने यासंबंधीची बातमी प्रसिद्ध केली आहे.