शुक्र ग्रहावरची बार्बी डॉल पृथ्वीवर अवतरली

बार्बी डॉल सारखं दिसण हे अनेक स्त्रियांच स्वप्न असतं. पण 28 वर्षाच्या मॉडल वेलेरिया ल्यूकानोवा हिने तर, मी जिवंत बार्बी डॉल आहे असाच दावा केला आहे.

Updated: Apr 9, 2014, 02:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, यूक्रेन
बार्बी डॉल सारखं दिसण हे अनेक स्त्रियांच स्वप्न असतं. पण 28 वर्षाच्या मॉडल वेलेरिया ल्यूकानोवा हिने तर, मी जिवंत बार्बी डॉल आहे असाच दावा केला आहे.
एखाद्या बाहूलीला शोभून दिसेल. असा चेहरा, डोळे, गुलाबी डोळे, सोनेरी केस, अशी सुंदरता या मॉडलमध्ये दिसून येते. या कारणानेच वेलेरिया ल्यूकानोवा ही एखादी बाहूली आहे की मॉडेल यात अनेकांचा गोंधळ होतो.
महत्वाच म्हणजे वेलेरिया ही जगातली पहिली जिवंत बार्बी डॉल आहे. कॉस्मेटिकची मॉडेल वेलेरियाचा असा विचार आहे की, प्लास्टिक सर्जरीमुळे मानव समाज हा विद्रुप होत चालला आहे. वेलेरीया म्हणते " 1950-60 च्या दशकात स्त्रिया सर्जरी न करता देखील सुंदर दिसत होत्या, पण आता सुंदर दिसण्यासाठी सर्जरी करावी लागते."
2013 मध्ये वेलेरिया ल्यूकानोवा हिने दावा केला की, ती या पृथ्वीवरची महिला नसून ती शुक्र ग्रहावरुन आली आहे. 2012 मध्ये वेलेरिया ही जिवंत बार्बी डॉल म्हणून लोकांमध्ये प्रसिद्ध झाली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.