पतीच निघाला पिता

एका ६० वर्षीय महिलेला तिच्या पतीच्या निधनानंतर समजलं की तिचा पती हा तिचा पिताही होता.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 20, 2012, 05:53 PM IST

www.24taas.com, न्यूयॉर्क
न्यूयॉर्क शहरात सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारी एक घटना नुकतीच उघड झालीय. एका ६० वर्षीय महिलेला तिच्या पतीच्या निधनानंतर समजलं की तिचा पती हा तिचा पिताही होता. ही गोष्ट तिला तिच्या काकांकडून समजलीय. त्यामुळे साहजिकच तिला बसलेला धक्का मोठा होता.
ओहयो प्रांतातील डोयलेसटाऊनमध्ये राहणारी वलेरी स्प्रूइल १९९८ मध्ये आपल्या पतीच्या निधनानंतर सहा वर्षांनी ही गोष्ट समजलीय. हा धक्का पचवताना वलेरीची दमछाक झालीय. त्यामुळेच आता तिच्यावरचा हा प्रसंग ती लोकांसमोर मांडतेय. इतरांवर जर अशी वेळ आली तर ते यांसारख्या धक्क्यांसाठी मानसिकरित्या तयार असावेत, असं तिची आशा आहे.
न्यूयॉर्क डेली न्यूजच्या बातमीनुसार, वलेरी स्प्रूइल जेव्हा तीन वर्षांची होती तेव्हापासून ती आपल्या आजी-आजोबांकडेच वाढली. त्यामुळेच ती आजीला आई आणि आजोबांना वडील समजत राहिली. कुटुंबाची मैत्रिण म्हणून ती ज्या स्त्रीला ओळखत होती तीच महिला वलेरीची आई होती.
वलेरी स्प्रूइल म्हणते, ‘ही गोष्ट दुसऱ्यांनाही माहित पडणं गरजेचं आहे. कारण, माझा पती हाच माझा पिता असल्याची गोष्ट मला समजली तेव्हा मी आतून कोसळून गेले होते’. स्प्रूइलच्या आईचं १९८४ मध्ये निधन झालं. २००४ मध्ये डीएनए चाचणीद्वारे स्प्रूइलला तिचा पती आणि पिता हा एकच व्यक्ती असल्याची गोष्ट समजली. तिच्या पतीला ही गोष्ट माहित होती की नाही याची कल्पना स्प्रूईलला नाही. पण, आता आपल्या भावंडांचा शोध स्प्रूईल घेतेय.