पाकिस्तानला कोर्टाचा दणका, जाधव यांच्या फाशीला स्थिगिती

 माजी भारतीय नेव्हीचा अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमध्ये फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्या विरोधात भारत आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला. त्यानंतर न्यायालयात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी सोमवारी आपली बाजु मांडली. यावर आज निकाल आला.

Updated: May 18, 2017, 04:10 PM IST
पाकिस्तानला कोर्टाचा दणका, जाधव यांच्या फाशीला स्थिगिती title=

नवी दिल्ली : माजी भारतीय नेव्हीचा अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमध्ये फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्या विरोधात भारत आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला. त्यानंतर न्यायालयात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी सोमवारी आपली बाजु मांडली. यावर आज निकाल आला.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना सर्व मदत देण्याचे आदेश दिले आहेत. सुनावणी पूर्ण होईपर्यंत जाधव यांना फाशी न देण्याचे आदेश दिले आहेत. सुनावणी दरम्याने सर्व गोष्टी कोर्टासमोर ठेवण्याचे पाकिस्तानला आदेश देण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय कोर्टाने निकाल येईपर्यंत फाशी न देण्याचे आदेश पाकिस्तानला देत चांगलाच दणका दिला आहे.

कुलभूषण जाधव यांना काऊंसलर एक्सेस देण्याचे पाकिस्तानला कोर्टाने आदेश दिले आहेत. कुलभूषण जाधव यांच्या जीवाला धोका असल्याचं देखील कोर्टाने म्हटलं आहे. कुलभूषण जाधव यांना अटक करणं वादात्मक प्रकरण आहे असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. व्हिएन्ना करार दोन्ही देशांसाठी बंधनकारक आहे. पाकिस्तान उपस्थित केलेले आक्षेप कोर्टाने फेटाळले.

भारताने अनेक पुरावे न्यायालया समोर ठेवत जाधव यांच्यावर पाकिस्तानने केलेले सगळे आरोप खोटे असल्याचं म्हटलं होतं. तर पाकिस्तानने हा राष्ट्रीय सुरक्षेचं प्रकरण असल्याने आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या सुनावणीवर प्रश्न उपस्थित केले होते. पण ते कोर्टाने फेटाळले आहे आणि पहिला निकाल भारताच्या बाजुने आला आहे.