भारताने केले चीनला हद्दपार!

Last Updated: Wednesday, April 24, 2013 - 14:43

www.24taas.com, नवी दिल्ली

लडाखमध्ये चीनने केलेली घुसखोरी लक्षात घेता भारताने चीनला त्याबाबत खडसावले आहे. चीन आणि भारताचे लष्कर आमने-सामने आल्याचेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले.

चिनी सैनिकांनी १५ एप्रिल रोजी लडाखमधील दौलत बेग ओल्डी सेक्यरमधील ‘एलएसी’वरून भारताच्या हद्दीत सुमारे दहा किलोमीटर आत घुसखोरी केली होती. त्यामुळे उभय देशातील द्विपक्षीय संबंधात तणाव निर्णय झाला आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबरूद्दीन यांनी चीनला हा इशारा दिला आहे. या विषयाची संपूर्ण माहिती घेण्यात येत असून, त्याबाबत योग्य तो प्रतिसाद दिला जाईल. असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

भारत आणि चिनी लष्काराच्या प्रत्यक्ष ताबा रेषेवरील लष्करी अधिकाऱ्यांत या विषयावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी फ्लॅग मिटिंग झाली. मात्र या बैठकीत परिस्थितीवर तोडगा काढण्यात अपयश आल्याचे लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.First Published: Wednesday, April 24, 2013 - 14:43


comments powered by Disqus