भारतीय मानतात बलात्कार ही राष्ट्रीय समस्या - सर्व्हे

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, April 23, 2014 - 08:17

www.24taas.com, वृत्तसंस्था, लंडन
बलात्कार ही घटना राष्ट्रीय गंभीर समस्या भारतीय मानतात, असे एका सर्व्हेने स्पष्ट केले आहे. पीव संशोधन केंद्राने याबाबत अभ्यास केला. त्यानंतर हा निर्ष्कष काढला आहे.
बलात्काराबाबत करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये 10 पैकी 9 जणांनी बलात्कार हा अपराध असल्याचे म्हटले आहे. देशातील ही मोठी समस्या आहे, असे भारतीयांना वाटते.
10 पैकी जवळपास 8 जणांनी म्हणजेच 82 टक्के म्हणणे आहे की, ही समस्या वाढतच आहे. चार पैकी तीन भारतीन म्हणजेच 74 टक्के सांगतात बलात्कार करणाऱ्यांसाठी करण्यात आलेल्या कायदा कमकुवत आहे. तर 78 टक्के पोलीस अशा घटनांच्या चौकशीच्या शेवटपर्यंत जात नाहीत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 23, 2014 - 08:16
comments powered by Disqus