ऑस्ट्रेलियातील बलात्कार प्रकरणी भारतीय डॉक्टर दोषी

दोन महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी भारतीय डॉक्टीरला मेलबर्न कोर्टानं आज दोषी ठरविलंय. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सॅनबरी मेडिकल क्लिीनिकमध्ये तपासणीसाठी आलेल्या दोन महिलांवर मनू मैमंबिल्ली गोपाल या ३९ वर्षीय डॉक्टरनं बलात्कार केल्याचा आरोप आहे.

Aparna Deshpande | Updated: Sep 18, 2013, 10:24 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मेलबर्न
दोन महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी भारतीय डॉक्टीरला मेलबर्न कोर्टानं आज दोषी ठरविलंय. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सॅनबरी मेडिकल क्लिीनिकमध्ये तपासणीसाठी आलेल्या दोन महिलांवर मनू मैमंबिल्ली गोपाल या ३९ वर्षीय डॉक्टरनं बलात्कार केल्याचा आरोप आहे.
भारतामध्ये पळून येण्याच्या तयारीत असताना मेलबर्न आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्याला १ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान त्यानं एका विद्यार्थीनीसह एका महिलेवर बलात्कार केल्याचं उघड झालंय.
दोन आठवड्यांच्या कसून चौकशीनंतर ही बाब पुढं आली. एक पोटदुखीनं त्रस्त असलेली विद्यार्थिनी उपचारासाठी मनू मैमंबिल्ली गोपाल याच्या क्लिनिकमध्ये आली असता. त्यानं दरवाजा बंद करुन हे कुकर्म केलं. तर दुसरी महिला ही चार मुलांची आई आहे. तिला पोटाच्या उजव्या भागात दुखत होतं म्हणून ती उपचारासाठी गेली होती. डॉ. गोपालनं तिची अंतर्गत तपासणी करावी लागेल असं सांगितलं आणि बलात्कार केला.
या दोन्ही घटनांमध्ये डॉ. गोपालनं रुग्ण महिलांना कोणत्याही प्रकारचा लेखी रिपोर्ट दिला नव्हता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.