मुलीच्या जन्मानंतर भारतीय तरुणाची दुबईत चांदी!

दुबईस्थित असलेल्या मूळ भारतीय तरुणाच्या घरी मुलीच्या जन्मानंतर घरात आनंदाचं वातावरण असतानाच आणखी एक आनंदाची आणि श्रीमंतीची बातमी येऊन धडकली...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 7, 2014, 10:37 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दुबईस्थित असलेल्या मूळ भारतीय तरुणाच्या घरी मुलीच्या जन्मानंतर घरात आनंदाचं वातावरण असतानाच आणखी एक आनंदाची आणि श्रीमंतीची बातमी येऊन धडकली... त्यामुळे या तरुणाच्या आनंदाला काही पारावरच उरलेला नाही.
दुबईत फुसलुद्दीन कुट्टीपालक्काल या भारतीय टेलरला दुबई शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये लॉटरी लागलीय. फसलुद्दीन गेल्या १० वर्षांपासून दुबईमध्ये राहत आहे. लॉटरीच्या बक्षिसात त्याला चक्क सोळा लाख रुपये आणि दोन लक्झरी कार मिळाल्या आहेत. कुट्टीपालक्काल गेली दहा वर्षे या फेस्टिव्हलमध्ये लॉटरीचे तिकीट विकत घेत होता. मात्र, त्याला एकदाही लॉटरी लागली नव्हती.
कुट्टीपालक्काल हा मूळचा केरळचा असून तो मिळालेल्या पैशातून केरळमध्ये स्वत:चे घर बांधणार आहे. तसेच या लॉटरीत त्याला ‘क्यूएक्स ६०’ आणि ‘जी २५’ या लक्झरी कारही मिळाल्या आहेत. आपल्या मुलीच्या जन्माच्या तिसऱ्याच दिवशी ही लॉटरी लागल्यानं फसलुद्दीनं याच श्रेय मुलीला दिलंय.
फसलुद्दीन यांनी जिंकलेल्या रकमेचा एक भाग भारतात राहणाऱ्या गरजवंत मित्रांना आणि कुटुंबीयांना देण्याचा निर्णय घेतलाय... आणि उरलेले पैसे तो स्वत:साठी घर बनविण्यासाठी वापरणार आहे. पण, बक्षिसात मिळालेल्या दोन गाड्यांचं काय करायचं? याचा निर्णय मात्र अजूनही तो घेऊ शकलेला नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.