भारतीय पर्यटक वळतायेत चीनकडे...

By Aparna Deshpande | Last Updated: Sunday, August 11, 2013 - 20:38

www.24taas.com , झी मीडिया, बिजिंग
भारतीय पर्यटकांसाठी चीन हळूहळू आवडतं ठिकाण बनू लागलंय. कमी बजेट आणि स्वस्त टूर पॅकेज यासाठी भारतीय पर्यटक आता चीनकडे वळू लागलाय. गेल्या वर्षात जवळपास ६ लाख भारतीय पर्यटकांनी चीनचा प्रवास केल्याचं एका टूर ऑपरेटरनं सांगितलं.
‘बिजिंग निंबस इंटरनॅशनल सर्विस’ या कंपनीचे महाव्यवस्थापक याओफेंग लियांग यांच्या मते चीनच्या बिजिंग, शांघाय, गुआंगजोउ, शियान यासारख्या कोणत्याही शहरात जा, इथं भारतीय पर्यटक आलेले दिसतील. चीनमध्ये पर्यटनाच्या क्षेत्रात वाढ होत असल्याचं लियांग म्हणाले. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘रहस्यपूर्ण चीन’ अभियान यशस्वी होत असल्याचं यावरुन स्पष्ट होतंय. तर दुसरीकडे भारताचं ‘अतुल्य भारत’ हे अभियानं आपला प्रभाव पाडण्यात कमी पडत असल्याचं दिसून येतंय.
सरकारी आकडेवारीनुसार २०१२मध्ये फक्त दीड लाख चीनी पर्यटकांनी भारताला भेट दिली, जरी ही संख्या आधीच्या वर्षाच्या तुलनेनं ९.५ टक्क्यांनी अधिक होती. भारतातले सेवानिवृत्त आणि श्रीमंत नागरिक चीनला जावून तिथल्या प्रसिद्ध अशा शॉपिंग मॉलमध्ये खरेदी करणं अधिक पसंत करु लागले आहेत. पर्यटक इथून स्वस्त आयपॅड, टन स्क्रिन फोन, घड्याळ तसंच थंडीचे कपडे मोठ्या संख्येनं खरेदी करतायेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, August 11, 2013 - 20:38
comments powered by Disqus