भारतीय पर्यटक महिलेचा थायलंडमध्ये दुर्दैवी अंत

थायलंड येथील समुद्रकिनाऱ्यावर भारतीय पर्यटक महिलेचा गुरुवारी पॅरासेलिंग करताना अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ती आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली होती.

Updated: Oct 4, 2013, 03:14 PM IST

www.24taas.com , वृत्तसंस्था, बॅंकॉक
थायलंड येथील समुद्रकिनाऱ्यावर भारतीय पर्यटक महिलेचा गुरुवारी पॅरासेलिंग करताना अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ती आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली होती.
या मृत्यूमुखी पडलेल्या या महिलेचे नाव शिल्पी अगरवाल (३६) आहे. थायलंडमधील पट्टाया येथील समुद्रकिनाऱ्यावर पॅरासेलिंग करण्यासाठी अगरवाल दांपत्याने एक स्पीडबोट भाड्याने घेतली होती. मात्र, या बोटीमधून वेळेवर ‘लॉंच` करण्यात अपयश आल्याने अगरवाल ही महिला पाण्यात पडली.
चालकाने निष्काळजीपणे बोट मागे घेतल्याने बोटीच्या पात्यात सापडून शिल्पी यांचा मृत्यू झाला. या स्पीडबोटीच्या चालकाविरोधात निष्काळजीपणामुळे मृत्यू ओढविण्यास कारण ठरल्याचा आरोप ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांतर्गत १० वर्षांचा कारावास किंवा २० हजार बह्त (६३८ डॉलर्स) चा दंड ठोठाविण्याची तरतूद आहे.
अगरवाल यांच्या कुटुंबियाना बोटीच्या विमा कंपनीकडून २ लाख बह्त (६३८३ डॉलर्स) नुकसानभरपाई म्हणून दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.