आंतरराष्ट्रीय बातम्यांवर एक नजर...थोडक्यात

दक्षिण सुदानमध्ये सुरु असलेल्या जातीय संघर्षाने भयानक रुप घेतलंय. तर बगदादमध्ये स्फोटात १५ जण जखमी झाले आहेत. तसेच अमेरिकेत झालेल्या जबरदस्त बर्फवृष्टी झाल्याचे दिसत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 26, 2013, 01:18 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, दक्षिण सुदान
दक्षिण सुदानमध्ये सुरु असलेल्या जातीय संघर्षाने भयानक रुप घेतलंय. तर बगदादमध्ये स्फोटात १५ जण जखमी झाले आहेत. तसेच अमेरिकेत झालेल्या जबरदस्त बर्फवृष्टी झाल्याचे दिसत आहे.
दक्षिण सुदानमध्ये जातीय संघर्ष
- दक्षिण सुदानमध्ये सुरु असलेल्या जातीय संघर्षाने भयानक रुप घेतलय. या संघर्षात आत्तापर्यंत हजारो लोकांनी जीव गमावला असून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं सुदानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षा रक्षकांच्या संख्येत वाढ करण्याची सूचना दिलीय. मात्र संघर्षातून झालेल्या रक्तपातामुळे ठिकठिकाणी मृतदेह पडले असून त्यामुळे रोगराई पसरण्याचं संकट उभं राहिलय.
बगदादमध्ये स्फोट
- इराकची राजधानी बगदादमध्ये एका चर्च बाहेर स्फोट घडवण्यात आला..ख्रिश्चन वस्ती असलेल्या या भागात झालेल्या या स्फोटात 15 लोकांनी जीव गमावलाय...
अमेरिकेत जबरदस्त बर्फवृष्टी
- अमेरिकेत झालेल्या जबरदस्त बर्फवृष्टीमुळे तब्बल 4 लाख लोकांना यंदा विजेविनाच नाताळ सण साजरा करावा लागला..तर दुसरीकडे अफगाणिस्तानमध्ये असलेल्या 47 हजार अमेरिकन सैन्याने आपलं घर आणि घरच्यांपासून दूर ख्रिसमस साजरा करवा लागला..सैन्यदलासाठी काबूलमध्ये एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं..
थायलँडमध्ये सरकार विरोध
- थायलँडमध्ये अजूनही सरकार विरोधात ठिकठिकाणी प्रदर्शन सुरु आहे. प्रदर्शनकर्त्यांनी बँकॉकमधील एका स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला.
चीनमधील ख्यातनाम कवी
-चीनचे कम्युनिस्ट, राजनिती तज्ज्ञ आणि कवी म्हणून ख्याती असलेले माओ त्से तुंग यांची आज 120वी जयंती आहे. चीनमध्ये त्यांच्या जयंती निमित्त अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. माओंना जाऊन आज 37 वर्षांचा काळ लोटला असला तरी चीनमधील जनतेला त्यांचा विसर पडलेला नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ