सेक्स नाही केला तर जांघेवर टाकत होते उकळते पाणी

Updated: May 31, 2015, 04:00 PM IST
सेक्स नाही केला तर जांघेवर टाकत होते उकळते पाणी  title=

 

बगदाद : दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (इसीस)च्या दहशतवाद्यांनी नऊ महिन्यांपर्यंत एका युवतीवर रेप केला. १७ वर्षांची ही यजीदी युवती नऊ महिने झालेल्या छळाची हकिकत सांगितली. 

अविवाहीत मुलींचा लिलाव झाला, यात मला आणि माझ्या बहिणीला विकण्यात आले. आम्हांला इसीसने खरेदी केले. त्यानंतर इसीससाठी लढणारे दररोज आमच्यावर बलात्कार करीत होते. 

ही तरूणी आता तीन महिन्यांची गर्भवती आहे. डेली मेल या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार या नऊ महिन्यातील प्रत्येक दिवशी तिला जीवन आणि मृत्यूपैकी एकाची निवड करावी लागत होती. इसीससाठी लढणारे आणि त्यांच्या अंगरक्षकांच्या दलाची यौन इच्छेची तृप्ती नाही झाली तर त्यांना मरण यातनेतून जावे लागत होते. 

या तरूणीने सांगितले की, कसा तिच्यावर सामुहिक बलात्कार झाला. इसीसच्या नराधमांकडून त्यांची यौन मागणी पूर्ण न झाल्यास तिला चाबूकने मारण्यात येत होते किंवा तिच्या जांघेवर उकळते पाणी टाकण्यात येत होते. 

इसीसने इराकचा सिंजर भागावर कब्जा केल्यानंतर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या तरूणीचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर तिला सीरियाच्या रक्काला आणण्यात आले. त्यानंतर डझनभर महिला आणि तरूणीसह तिची व्हर्जिनीटीची चाचणी करण्यात आली. 

तरूणीला त्या भयावह दिवसांची आठवण आल्यावर तिच्या अंगाचा थरकाप होतो. ती म्हणाली, व्हर्जिन तरूणींना ४० पुरूषांसह एका खोलीत नेण्यात येत होते आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला जायचा. या तरूणीला चेचेन्याच्या अल-रसियाने खरेदी केले होते. कुर्दीश सैनिकाशी लढताना अल-सरिया आणि त्यांच्या अंगरक्षक मारले गेले. ही बातमी मिळताच ही तरूणी इतर तरूणींसह तेथून पलायन करण्यात यशस्वी झाली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.