'इसिस'ची हस्तक भारतीय महिला अफ्शा हिला अटक

इसिस या दहशतवादी संघटनेमध्ये तरुणांना ओढण्याचे काम करणाऱ्या भारतीय महिला हस्तक हिला पोलिसांनी अटक केलेय. तिला आधी दुबईतून देशात आणण्यात आले.

PTI | Updated: Sep 12, 2015, 10:51 AM IST
'इसिस'ची हस्तक भारतीय महिला अफ्शा हिला अटक title=
छाया - : ट्विटर

हैदराबाद : इसिस या दहशतवादी संघटनेमध्ये तरुणांना ओढण्याचे काम करणाऱ्या भारतीय महिला हस्तक हिला पोलिसांनी अटक केलेय. तिला आधी दुबईतून देशात आणण्यात आले.

अफ्शा जबीन तर्था निकी जोसेफ असे या महिलेचे नाव आहे. ती इसिससाठी काम करीत होती. ती तरुणांना इसिसमध्ये ओढण्यासाठी काम करीत होती, असा तिच्यावर आरोप आहे. जबीन मूळची हौदराबादची आहे. ती स्वत:ला ब्रिटिश नागरिक असल्याचे सांगून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना आपल्याकडे आकर्षित करून इसिसमध्ये ओढण्याचे काम करीत असे.

अधिक वाचा : नाशिकचं इसिस कनेक्शन: गौरवचं अपहरण, धर्मांतर करून इसिसला रवानगी

जबीन हिला आबुधाबीमध्ये थरारकपद्धीने ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तिला पती, मुलांसह भारतात पाठविण्यात आले. ती भारतात परताच पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. नंतर तिला अटक केली. तिची चौकशी पोलिसांकडू करण्यात येत आहे.

दरम्यान, इसिससाठी काम करण्यासाठी हैदराबादचा सलमान मोहीउद्दीन हा जानेवारीत दुबईला जाण्याच्या तयारीत असताना त्याला विनामतळावर अटक करण्यात आले होते. जबीन ही सलमानची हस्तक अल्याचे पुढे आलेय, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

अधिक वाचा : परदेशात नोकरीचं आमिष दाखवून तरुणाचे अपहरण

सलमान आणि जबीन यांनी सोशल मीडियाचा आधार घेत अनेक तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रयत्न केला. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगना, बिहार येथील तरुणांच्या संपर्कात राहून त्यांना इसिससाठी ओढण्याचा उद्योग सुरु केला होता, अशी माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.