इसिसचं नवं हत्यार : एड्स बॉम्ब

दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने आणखी काही वाईट कृत्य केल्याचं समोर आलं आहे. आयएसने सिरिया आणि इराकमधील सर्वात मोठ्या भागावर कब्जा केला आहे. आपलं राज्य कायम ठेवण्यासाठी इसीसने सर्व मर्यादा पार केल्या आहेत.

Updated: Aug 23, 2015, 03:28 PM IST
इसिसचं नवं हत्यार : एड्स बॉम्ब title=

बगदाद : दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने आणखी काही वाईट कृत्य केल्याचं समोर आलं आहे. आयएसने सिरिया आणि इराकमधील सर्वात मोठ्या भागावर कब्जा केला आहे. आपलं राज्य कायम ठेवण्यासाठी इसीसने सर्व मर्यादा पार केल्या आहेत.

एडसग्रस्तांचं आत्मघातकी पथक
इसीसीच्या काही दहशतवाद्यांना एडस झाल्याचं समोर आलं आहे. यानंतर या दहशतवाद्यांनी इसीसने आत्मघातकी पथकात पाठवण्याचं ठरवलं आहे. एचआयव्ही ग्रस्त हे १६ दहशतवादी विशेष मोहिमेवर पाठवले जाणार आहेत. सध्या या दहशतवाद्यांना वेगळ्या रूममध्ये ठेवण्यात येत आहे.

दोन मोरक्कन महिलांकडून लागण
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मोरक्कन महिलांसोबत शारिरिक संबंध आल्यानंतर या दहशतवाद्यांना एड्स झाला, या दोन मोरक्कन महिला एडसग्रस्त आहेत, हे समजण्याआधीच या महिलांनी पळ काढला आहे, कारण त्यांनी भीती होती, इसीसीकडून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात येईल. 

सेक्स गुलाम, दहशतवादी, एडस, आणि फाशी
इसीस नियंत्रित हसका शहरातही एड्स पसरण्याची बातमी समोर आली आहे, एचआयव्ही बाधित असलेल्या एका इंडोनेशियन दहशतवाद्याने एका सेक्स गुलामशी सेक्स केल्यानंतर, त्याने तिला विकलं होतं, तसेच त्याने रक्तदानही केलं, यानंतर जून महिन्यात त्याला फाशी देण्यात आली.

बगदादीकडून अमेरिकन महिलेवर सतत बलात्कार
इस्लामिक स्टेटचा प्रमुख अबू बक्र अल-बगदादीने एका अमेरिकन महिलेला सेक्स गुलाम बनवलं होतं. बगदादी हा महिलेवर पुन्हा-पुन्हा रेप करत होता. या अमेरिकन महिलेचं नाव कायला म्यूलर होतं, ही महिला या ठिकाणी मदत आणि बचावकार्यासाठी कार्यरत होती. आता म्यूलर या जगात नसल्याच्या बातमीला तिच्या आई-वडिलांनी दुजोरा दिला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.