'बकरी ईद'ला माणसांना उलटं लटकावून जनावरांसारखं कापलं!

बकरी ईदच्या निमित्तानं ठिकठिकाणी उत्साह पाहायला मिळत असताना दुसरीकडे आयसिस या दहशतवादी संघटनेचं क्रौर्य जगासमोर आलंय. 

Updated: Sep 14, 2016, 02:25 PM IST
'बकरी ईद'ला माणसांना उलटं लटकावून जनावरांसारखं कापलं! title=

नवी दिल्ली : बकरी ईदच्या निमित्तानं ठिकठिकाणी उत्साह पाहायला मिळत असताना दुसरीकडे आयसिस या दहशतवादी संघटनेचं क्रौर्य जगासमोर आलंय. 

इसिसच्या क्रूर दहशतवाद्यांनी बकरी ईदला माणसांचीच कुर्बानी दिलीय. आयसिसनं एक व्हिडिओ जाहीर केलाय. यात त्यांनी काही लोकांचा गळा कापून त्यांना उलटं लटकावलेलं दिसतंय.

व्हिडिओमध्ये नारंगी रंगाचे कपडे परिधान केलेल्या काही लोकांना उलटं लटकावण्यात आलेलं दिसतं. त्यानंतर धारदार चाकूनं त्यांचे गळे कापलेले या व्हिडिओत दिसत आहेत. जवळपास १२ मिनिटांचा हा व्हिडिओ आहे. 

उत्तर सीरिया भागातील एका कत्तलखान्यात हा व्हिडिओ चित्रीत करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. तर व्हिडिओमध्ये जे बंधक दिसत आहेत ते अमेरिकन गुप्तहेर असल्याचं समजतंय. 'द मेकिंग ऑफ इल्युशन' असं या व्हिडिओला नाव देण्यात आलंय.  

हा आत्तापर्यंतचा सर्वात क्रूर पद्धतीनं चित्रीत करण्यात आलेला व्हिडिओ असल्याचं मानवाधिकार संघठनेचे कार्यकर्ते अबू मोहम्मद यांचं म्हणणं आहे.