'इसिस'मध्ये सहभागी झालेल्या कल्याणच्या तरुणाचा इराकमध्ये मृत्यू

Last Updated: Wednesday, August 27, 2014 - 15:24
'इसिस'मध्ये सहभागी झालेल्या कल्याणच्या तरुणाचा इराकमध्ये मृत्यू

कल्याण : कल्याणचा रहिवासी असलेल्या आरीफ मजीद या 'इसिस'मध्ये सहभागी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी आता समोर आलीय. 

कल्याण येथील चार युवक इराक येथील 'आयएसआयएस' म्हणजेच इसीस (ISIS) या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यापैकी आरीफ मजीद नावाच्या एका युवकाचा इराक़ येथे मृत्यू झाल्याचं इराकमधल्या एका वेबसाइटनं प्रसिद्ध केलंय. 

आरीफ यानं इराक इथं एका पॅलेस्टाईन मुलीबरोबर लग्न केलं आणि त्यानंतर तो लढाई करता गेला असता त्याचा मृत्यू झाल्याचं वेबसाईटनं प्रसिद्ध केलंय. कल्याण पोलीस या वृत्ताबाबत अधिक चौकशी करत आहेत. 

२३ मे रोजी हा युवक त्यांच्या चार साथीदारांसह इराकला रवाना झाला होता. २५ मे रोजी चार युवक बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी दिली होती आणि २७ मे या दिवशी या चार युवकांनी आपल्या पालकांशी संपर्क केला होता. आणि त्यानंतर तपास यंत्रणांनी या चार युवकांना फरार घोषित केलं होतं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Wednesday, August 27, 2014 - 15:23
comments powered by Disqus