बेबोला लंडनमध्ये मिळालं ‘सोनेरी मानपत्र’!

बॉलिवूड सूपरस्टार करिना कपूरचा ब्रिटनच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये गौरव करण्यात आलाय. एशिया सनडे न्यूजपेपर या वर्तमानपत्राच्यावतीनं भारतीय वंशाचे मेंबर ऑफ पार्लमेंट किथ वाझ यांच्या हस्ते बेबोला सोनेरी मानपत्र प्रदान करण्यात आलं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 30, 2013, 01:23 PM IST

www.24taas.com , पीटीआय, लंडन
बॉलिवूड सूपरस्टार करिना कपूरचा ब्रिटनच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये गौरव करण्यात आलाय. एशिया सनडे न्यूजपेपर या वर्तमानपत्राच्यावतीनं भारतीय वंशाचे मेंबर ऑफ पार्लमेंट किथ वाझ यांच्या हस्ते बेबोला सोनेरी मानपत्र प्रदान करण्यात आलं.
कलाक्षेत्रात करिनानं दिलेल्या योगदानाची दखल ब्रिटन निवासी आशियाई नागरिकांच्या या वृत्तपत्रानं घेतलीय. पुरस्कार स्वीकारताना यूके हे आपल्या आवडत्या स्थळांपैकी एक असल्याचं बेबो म्हणाली. आपली आजी ब्रिटिश होती, तसंच सासरे नवाब पतौडी हे ऑक्सफर्ड क्रिकेट संघाचे कॅप्टन होते याची आठवणही तिनं करून दिली.
३३ वर्षीय करिना कपूर-खानला काल रात्री ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये सन्मानित करण्यात आलं. करिनासोबतच गायल किम्बरले वाल्श आणि जादूगार डायनमो यांनाही गौरवण्यात आलं.
कभी खुशी कभी गम, ओंकारा, जब वी मेट, थ्री इडियट्स आणि बॉडीगार्ड सारखे अनेक हिट चित्रपट दिलेले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.