बराक ओबामांची मुलगी मालियाला लग्नाची मागणी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची मोठी कन्या मालिया हिला चक्क १६ व्या वर्षीच लग्नाची मागणी घालण्यात आली आहे. मागणी घालणारा तरुण हा वकिल असून तो केनियन आहे.

Reuters | Updated: May 28, 2015, 04:05 PM IST
बराक ओबामांची मुलगी मालियाला लग्नाची मागणी title=

नैरोबी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची मोठी कन्या मालिया हिला चक्क १६ व्या वर्षीच लग्नाची मागणी घालण्यात आली आहे. मागणी घालणारा तरुण हा वकिल असून तो केनियन आहे.

 १६ वर्षीय मालिया ओबामा हिला लग्नाची मागणी घातली गेल्याने सध्या जगभर चर्चा रंगली आहे. एका नैरोबियन वृत्तपत्राने फेलिक्स किपरोनो नावाच्या वकिलाची मुलाखत प्रसिद्ध केली आहे. यात फेलिक्स याने आपले मालिया ओबामावर अत्यंत प्रेम अल्याचे म्हटले आहे. आपण तिला लग्नासाठी मागणी घालणार आहे. मालियाशी लग्न करण्यासाठी फेलिक्सने ५० गायी, ७० मेंढ्या आणि ३० बकऱ्या देण्याची अजब ऑफरही देऊ केली आहे.

२००८ मध्ये मला मालियामध्ये रुची निर्माण झाली. त्यावेळी ओबामा पहिल्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत होते आणि तेव्हा मालियाचं वय अवघं १० वर्ष होते, असंही फेलिक्सने या मुलाखतीत म्हटलंय. आपलं प्रेम किती सच्चं आहे, हे सांगण्यासाठी आपण कुणालाही डेट केलेलं नाही, असंही त्याने मुलाखतीत म्हटलं आहे. माझ्या आई-वडिलांना देखील जेव्हा मी हे सांगितलं तेव्हा  त्यांनी मला पाठिंबा दिला, असे तो सांगतो.

माझ्या लग्नाचा प्रस्ताव ओबामांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्र लिहीले आहे. ते पत्र व्हाइट हाऊसचे संबंधित अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचवतील,  अशी आशा फेलिक्सने व्यक्त केली आहे. ओबामा जुलैमध्ये केनिया दौऱ्यावर येतील तेव्हा मालियालाही सोबत आणतील, असा विश्वासही फेलिक्सने व्यक्त केलाय.

मला मालिया खूप आवडते. त्यामुळे मला ओबामांच्या संपत्तीत रस नाही. माझं मालियावर खरं प्रेम आहे, असं फेलिक्सने स्पष्ट म्हटलं आहे. आपल्याला मालियासोबत मला अगदी साधं आयुष्य जगायचं आहे. मी मालियाला गाईचं दूध काढायला आणि उगाली व मुरसिक तयार करायलाही शिकवणार आहे. अगदी केनियातील आदिवासी महिला करतात तसं शिकवणार, असे त्याने मुलाखतीत म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.