कुलभूषण जाधव प्रकरण : पाकिस्तानी वकिलांची फी माहीत आहे का?

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारत सरकारकडून वकील हरीश साळवे यांनी केवळ एक रुपया मानधन म्हणून घेतलं... पण, तुम्हाला हे माहीत आहे का की पाकिस्तानची बाजू आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडण्यासाठी पाकिस्तानचे वकील खैबर कुरैशी यांनी किती मानधन घेतलं...?

Updated: May 19, 2017, 10:18 PM IST
कुलभूषण जाधव प्रकरण : पाकिस्तानी वकिलांची फी माहीत आहे का? title=

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारत सरकारकडून वकील हरीश साळवे यांनी केवळ एक रुपया मानधन म्हणून घेतलं... पण, तुम्हाला हे माहीत आहे का की पाकिस्तानची बाजू आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडण्यासाठी पाकिस्तानचे वकील खैबर कुरैशी यांनी किती मानधन घेतलं...?

पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, खैबर कुरैशी यांनी ही केस हाताळण्यासाठी तब्बल ५ लाख पाऊंड इतकी फी आकारलीय. इतकी मोठी फी घेऊनही आंतरराष्ट्रीय न्यायालयात ते सपशेल तोंडावर पडले. यामुळे पाकिस्तानात जोरदार रोष व्यक्त होतोय.