हुंड्याच्या प्रथेविरूध्द आठ हजार महिलांचा मोर्चा

Last Updated: Monday, September 30, 2013 - 13:44

www.24taas.com, वृत्तसंस्था, गुसाऊ
हुंड्याची प्रथा भारताप्रमाणे अन्य देशातही आहे. या प्रथेविरोधात भारतात कठोर कायदे असून आफ्रिकेतील नायजेरियात जमफारा राज्यात मात्र दुर्दैवानं तसं चित्र दिसत नाही.
बीबीसी या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीनं दिलेल्या वृत्तानुसार जमफारा राज्यात इस्लाममधील काही नियमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यानूसार वधुपक्षाला लग्नाच्या वेळी वरपक्षाला हुंड्यात लाकडी फर्निचर देणं बंधनकारक असतं.
मात्र नायजेरियातील हजारो महिलांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असल्यानं त्यांना हुंडा देणं अशक्य झालंय. त्यामुळं जमफाऱ्यातील महिलांसाठी काम करणाऱ्या एका समाजसेवी संस्थेने या प्रथेविरोधात लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थेतील महिला या अनाथ, विधवा किंवा घटस्फोटीत आहे.
हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे लग्नात फर्निचर देणे शक्य नसल्याने नायजेरियात आठ हजार महिलांचे अद्याप विवाह होऊ शकलेले नाही. या जाचक नियमात बदल करुन लग्नात मदत करावी अशी मागणी करत नायजेरियामध्ये आठ हजार महिला आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. अशा आठ हजार महिलांनी देशाच्या राजधानीत भव्य मोर्चा काढला होता.
आमची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून पोटाची खळगी भरणेदेखील अशक्य झाले आहे. अशावेळी फर्निचर देणं शक्य नसल्याने लग्नासाठी मुलगा मिळत नाही. त्यामुळे यावर सरकारनेच तोडगा काढून लग्नातील अडथळे दूर करावेत अशी मागणी या महिलांनी केला आहे. आता यावर जमफारा सरकारने तोडगा काढण्याचे आश्वासन दिलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.First Published: Monday, September 30, 2013 - 13:44


comments powered by Disqus