कसाब... आमचा हिरो!

क्रूरकर्मा कसाबला फासावर चढवल्याची बातमी समजल्यानंतर ‘लष्कर – ए – तोयबा’ या दहशतवादी संघटनेनं आगपाखड केलीय.

www.24taas.com, नवी दिल्ली
क्रूरकर्मा कसाबला फासावर चढवल्याची बातमी समजल्यानंतर ‘लष्कर – ए – तय्यबा’ या दहशतवादी संघटनेनं आगपाखड केलीय. ‘कसाब... हा आमचा हिरो आहे, त्यानं दिलेल्या बलिदानामुळे आम्हाला आणखी प्रेरणा मिळालीय’ असं म्हणत आपलं हल्ल्यांचं सत्रं सुरूच ठेवण्याचे संकेत या संघटनेनं दिलेत.
‘रॉयटर’ या वृत्तसंस्थेशी बोलताना ‘लष्कर – ए – तय्यबा’च्या कमांडरनं ही प्रतिक्रिया दिलीय. दरम्यान, पाकिस्ताननं मात्र कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
आज सकाळीच मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी क्रूरकर्मा अजमल कसाब याला पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आलीय. कसाबने दयेचा अर्ज केला होता. मात्र, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कसाबचा दयेचा अर्ज फेटाळून लावला आणि त्यानंतर आज त्याला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली.