आश्चर्य: आपल्या कुत्र्याला मालकीणनं केलं लखपती!

Last Updated: Tuesday, August 26, 2014 - 11:57
आश्चर्य: आपल्या कुत्र्याला मालकीणनं केलं लखपती!

न्यूयॉर्क: आपण इट्स एटंरटेनमेंट या चित्रपटात एका कुत्र्याच्या नावे सर्व संपत्ती असल्याचं पाहिलं. पण प्रत्यक्षातही हे घडलंय. 

सर्वात निष्ठावान प्राणी कोणता? असा प्रश्न विचारला तर कुत्रा हेच नाव सर्वात आघाडीवर असतं. कुत्र्याच्या या प्रामाणिकतेची किंमत काय असेल, एका कुत्र्याला त्याच्या प्रामाणिकतेची तब्बल 60 लाख रुपये किंमत मिळालीय. 

हा कोणता साधारण कुत्रा नाही. तर प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री लॉरेन बॅकॉलचा कुत्रा आहे. त्याच्या नावावर आपल्या मृत्युपत्रात लॉरेन यांनी 10 हजार डॉलर म्हणजे 60 लाख रुपयांहून अधिक संपत्ती केलीय. अभिनेत्री लॉरेन यांता याच महिन्यात मृत्यू झाला. 

एका वेबसाइटनुसार लॉरेन (89) आपल्या माघारी 2.66 कोटी डॉलर एवढी संपत्ती सोडून गेलीय. यातील 1.5 कोटी डॉलर त्यांच्या नातवांचे आहे. अनेक वर्षांपासून लॉरेन यांच्यासोबत राहिलेल्या कर्मचाऱ्यांना 21 लाख रुपये आणि त्यांचा कुत्रा पॅपीलन सोफीच्या देखरेखीसाठी 60 लाख रुपये देऊन गेल्या आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Tuesday, August 26, 2014 - 11:57
comments powered by Disqus