वजन घटवा...सोने मिळवा

Last Updated: Friday, July 19, 2013 - 14:48

www.24taas.com,झी मीडिया,दुबई
वजन घटवा...सोने मिळवा. ऐकून आश्चर्य वाटलं असेल ना? पण हे खरं आहे आता तुम्हाला वजन कमी करण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याची गरज नाही तर आता तुम्हालाच मिळणार आहे सोनं. बाजारात एक नवीन स्कीम आलीय. जर तुम्ही तुमचं वजन कमी करण्यात यशस्वी झालात तर तुम्ही जिंकू शकता सोने.
रमजानच्या धर्तीवर दुबईच्या नगरपालिकेने ३० दिवसांसाठी ही नवीम स्कीम आणलीय. जर तुम्ही एक किलो वजन घटवलं तर त्याबदल्यात मिळेल एक ग्रॅम सोने. या स्कीममध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येकाला दर दिवशी कमीत कमी दोन किलो वजन कमी करावं लागेल. रमजान संपल्यावर १६ ऑगस्टला सर्वांचे वजन तपासण्यात येईल आणि जितकं वजन कमी झालं असेल तितकं सोन त्या स्पर्धकाला मिळेल.
आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी रमजानपेक्षा चांगली वेळ नाही. याच कारणामुळे आम्ही ही स्कीम आखण्याचे ठरवले. असे दुबई नगरपालिकेचे अधिकारी हुसैन लूटाह यांनी स्पष्ट केलं.

`तुम्ही जेवढ वजन घटवाल तितकं सोनं तुम्ही मिळवू शकाल आणि लोकांचे मनोबल वाढवण्यासाठी आम्ही यायोजनेत कोणतीही सीमा ठेवलेली नाही`. असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दुबईच्या लोकांच्या जीवनशैलीत सुधारणा करण्यासाठी आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी ही योजना दुबईमध्ये राबवण्यात येतेय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.First Published: Friday, July 19, 2013 - 14:48


comments powered by Disqus